मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सावरकरांवर टीका, तरीही काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच; नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा...

सावरकरांवर टीका, तरीही काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच; नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा...


मुंबई: आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्धाटन केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ठाण्यातील काही प्रकल्पांचे लोकार्पण केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्धाटन केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ठाण्यातील काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी ठाण्यात केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरेंवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार निशाणा साधला. काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद होत आहे. जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहे. आम्ही वक्फ बिल आणलं. पण लांगूलचालून करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहे. वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही, असं ते म्हणत आहे.

वीर सावरकारांवर काँग्रेस टीका करते. तेव्हाही काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहत आहे. काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू. पण काँग्रेसच्या चेलांची बोलती बंद आहे. नवीन व्होट बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन, काँग्रेसची अशी हुजरेगिरी, काँग्रेसचं भूत ज्याच्या अंगात जातं त्याची हीच अवस्था होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

0 Response to "सावरकरांवर टीका, तरीही काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच; नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...