
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४
Comment
मुंबई: सायन -पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील 7 खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
सदर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री
श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे
मुख्य अतिथी तर सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ), मंत्री दादाजी भुसे हे प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर ठाणे खाडी पुलाची मुंबईहून
पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवारपासून सुरु होईल.
प्रकल्पांची
माहिती
1)सायन पनवेल महामार्गावरीलठाणेखाडी पुल क्र.3
प्रकल्पामधील
कामाचा वाव:
प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पुल बांधणे . (मुंबईहुन
पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या
दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर )
* प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.
* पुलाची लांबी : 3180
मी. ( पोच रस्त्यासह )
* सद्यास्थितीत उत्तर वाहिनी
पुलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या दक्षिण वाहिनीचे काम ८० % पूर्ण झाले आहे
* पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत
महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी
किनाऱ्यांना कॉलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.
* सागरी महामार्गावरील पुढील सात
पुलांचे भूमिपूजन होत आहे.
* सर्व 7 पुलांची एकूण लांबी 26.70
किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता
रु. 7851 कोटी इतकी
आहे.
1)रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी
वरील पुल
* एकूण लांबी : 10.20
किमी.
* प्रशासकीय मान्यता : रु. 3057
कोटी
* पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज
(लोखंडी पुल)
* कामाची मुदत : 3 वर्ष
2)रेवदांडा- साळाव भागातील
कुंडलिका खाडी वरील पुल:
* एकूण लांबी : 3.82
कि मी
* प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736
कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष
3) दिघी आगरदांडा
भागातील आगरदांडा खाडी वरील पुल:
* एकूण लांबी : 4.31
किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : 1315
कोटी.
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष
4) बागमांडला
वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पुल :
* एकूण लांबी : 1.711
किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष
5) केळशी भागातील
केळशी खाडीवरील पुल :
* एकूण लांबी : 670 मी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
* पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
* कामाची मुदत : 3 वर्ष
6) जयगड खाडीवरील
पुल:
* एकूण लांबी : 4.40
किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष
7) कुणकेश्वर
येथील पुलाचे बांधकाम
* एकूण लांबी : 1580
मी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
0 Response to "विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... "
टिप्पणी पोस्ट करा