.webp)
म्हणून त्यांनी अक्षय शिंदेला मारले, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा गंभीर आरोप...
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
Comment
मुंबई : Badlapur Akshay Shinde
Encounter: बदलापूर
अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी
करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा
व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना
वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय
शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी
पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला.
अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे
कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरणाची
न्यायिक चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबई येथील शासकीय
निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर पक्षाची
भूमिका मांडली.
0 Response to "म्हणून त्यांनी अक्षय शिंदेला मारले, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा गंभीर आरोप..."
टिप्पणी पोस्ट करा