मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक लाखाहून अधिक अर्ज.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक लाखाहून अधिक अर्ज.

 


पुणे,    :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत १ लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले असून शहरातील पात्र महिलांनी योजनेचा लाभकरीता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.


महिला लाभार्थ्यांना या योजनेचा मिळावा याकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. योजनेचा प्रचार व प्रसिद्धीकरीता   अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला.


यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, लिपिक अभिजित डोळस, महापालिका कर्मचारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते.


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेची माहिती  महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहितीही देण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत विविध माध्यमाद्वारे योजनेची माहिती देण्यात येत आहे.  घरोघरी हस्तपत्रिका आणि माहिती पत्रिका वितरित करण्यात येत आहेत.


पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महिला विकास महामंडळाच्या महिलांच्या आधारे ऑफलाईनपद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहे. सदरचे अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी १२३ पेक्षा जास्त सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर भेट देवून अधिकाधिक पात्र महिलांनी विहित मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

0 Response to "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक लाखाहून अधिक अर्ज."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...