
बॅग मध्ये कोंबून तुतारी एक्सप्रेस मधून नेला जात होता मृतदेह*!!..
सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४
Comment
मुंबई :- राजधानी मुंबईतील मोठं रेल्वे जंक्शन आणि कायम गर्दीनं गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर चक्क एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.
प्रथम दर्शनी आरोपी प्रवाशांच्या हालचालीवरुन संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता बॅगमध्ये मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात ही हत्या घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे पोलिसांमुळे अवघ्या चार तासांत या गुन्ह्याची उकल करण्यात पायधुनी पोलिसांना यश आलं आहे. मात्र, आरोपी हे मुकबधीर असल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
0 Response to "बॅग मध्ये कोंबून तुतारी एक्सप्रेस मधून नेला जात होता मृतदेह*!!.."
टिप्पणी पोस्ट करा