मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल-रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी.

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल-रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी.


उरण : पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने वाको इंडिया सीनियर नेशनल किकबॉक्सिंग चँपियनशिप २०२४ ,इनडोअर स्टेडिअम ,म्हापसा ,गोवाच्या स्पर्धेत वाको महाराष्ट्र कोच व मुख्य प्रशिक्षक निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किकलाईट -७४ किलोवजनी गटात सुवर्ण पदक पटकावले . 

     तसेच अनुज भोसले यांनी किकलाईट -८९ किलोवजनी गटात रौप्यपदक व लाइट काँटॅक्ट -८९ किलोवजनी गटात कांस्यपदक,चिराग शिवगण याने किकलाईट +९४ किलो प्रकारात रौप्यपदक , आर्यन शिवतरकर किकलाईट -९४किलो प्रकारात कांस्यपदक , फाल्गुनी दकोलीया

 लो-किक -४८किलो प्रकारात

रौप्यपदक पटकाविले. तर हर्षदा मोकल हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले .या सर्व खेळाडूंचे वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलास व पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन सचिव मंदार पनवेलकर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

0 Response to "राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल-रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...