
काळसुरी हायस्कूल ला मंत्री अदिती तटकरे यांचा मदतीचा हात.! इमारत दुरुस्ती करून दहा दिवसातच शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले...
सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४
Comment
विशेष प्रतिनिधी : आकाश पेरवी : मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने दिनांक 24 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावात असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या प्रभाकर नारायण पाटील हायस्कूलचे फार मोठे नुकसान झाले होते यामध्ये शाळेतील बर्याच शैक्षणिक साहित्याचेही फार नुकसान झाले होते. ही माहिती मिळताच राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शाळेची पाहणी केली होती. या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शाळा बंद राहून शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिती तटकरे यांनी ताबडतोब शाळा इमारत दुरुस्ती करून दिली आणि दहा दिवसातच शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले.
हे शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी काळसुरी शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मंत्री आदिती तटकरे यांचे सहाय्यक अनिकेत पवार, महिला तालुका अध्यक्ष मीनाताई टिंगरे, माजी सभापती छायाताई म्हात्रे, गण अध्यक्ष अनिल बसवत, काळसुरी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र घोसाळकर, शाळेचे चेअरमन चंद्रकांतजी बेडेकर उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, ग्रामस्थांनी आणि महिलांनी मंत्री अदिती ताई तटकरे आणि राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानले.
0 Response to "काळसुरी हायस्कूल ला मंत्री अदिती तटकरे यांचा मदतीचा हात.! इमारत दुरुस्ती करून दहा दिवसातच शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले..."
टिप्पणी पोस्ट करा