मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारतीय मजदूर संघाचा ७० वा स्थापना दिवस जेएनपीए टाऊनशिप उरण येथे मोठया उत्साहात साजरा..

भारतीय मजदूर संघाचा ७० वा स्थापना दिवस जेएनपीए टाऊनशिप उरण येथे मोठया उत्साहात साजरा..


उरण :  भारतीय मजदूर संघाचा ७० वा स्थापना दिवस जेएनपीए टाऊनशिप उरण येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय मजदूर संघाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त जेएनपीए टाऊनशिप मध्ये कामगार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता. विशेषतः महिला कामगारांची उपस्थिती लक्षणीय होती.


 यावेळी या समारंभाचे अध्यक्ष कामगार नेते,भारतीय मजदूर संघांचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमुख वक्ते बाळासाहेब भुजबळ ( बीएमएसचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री), कामगार नेते सुधीर घरत,जेएनपीए कामगार विश्वस्त रविंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.



 प्रमुख वक्ते बाळासाहेब भुजबळ यांनी आपल्या भाषणात भारतीय मजदूर संघाची सविस्तर माहिती सांगताना आपण सर्वजण फक्त देशहितासाठी काम करत असून येथे मी पणाला जागा नाही. एका परिवारावर प्रमाणे आपण काम करीत आहोत. म्हणून आज देशातील नव्हे जगातील सर्वात बलाढ्य कामगार संघटना हा लौकीक प्राप्त झाला आहे असे विचार व्यक्त केले.



 कामगार कामगार नेते सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढील वर्षे हे ७० वे वर्षे असून वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम राबवून ७० वे वर्षे साजरा करणार असून संपूर्ण जिल्ह्यात असे कार्यक्रम होणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर अनिल चिर्लेकर, प्रमोद पाटील, नुरा शेख, डी पी सोनावणे, रवी नाईक, लंकेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





कोट (चौकट ):- 



जगभरातील कामगार संघटना भारतीय मजदूर संघाचे मार्गदर्शन घेत आहेत कार्यपद्‌धती समजून घेत आहेत. राष्ट्र सर्वोपरि या ब्रिद‌वाक्याने जागतीक कामगार विश्व प्रभावीत आहे. देशहित नजरेस‌मोर ठेऊन काम करणारी एकमेव कामगार संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ आज जगातील कामगार संघटनांची विश्वगुरू झाली आहे 

 - कामगार नेते सुधीर घरत.




जेएन‌पीए मध्ये ठेकेदारी पद्‌धतीने काम करणाऱ्या कामगारांना त्यांची ग्रॅज्युईटी मिळवून येणार त्यासाठी विश्वस्त मंडळाच्या बोर्डात ठराव मंजूर करून घेणार.

 - कामगार विश्वस्त रविंद्र पाटील.

0 Response to "भारतीय मजदूर संघाचा ७० वा स्थापना दिवस जेएनपीए टाऊनशिप उरण येथे मोठया उत्साहात साजरा.."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...