
दापोली तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटीवर पारंपारिक पद्धतीने धुळवड साजरी केली.
बुधवार, ८ मार्च, २०२३
Comment
दापोल प्रतिनिधी :- मुझम्मील जैतापकर - सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह सर्वत्र होलिकोत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा होत असताना कोकणात देखील मोठ्या जल्लोषात होलिकोत्सव साजरा होत आहे,कोकणातील होलिकोत्सव म्हणजे शिमगा ज्याची असंख्य चाकरमानी आतुरतेने वाट पाहत असतात.कारण कोकणात शिमगा म्हणजे केवळ होळीका दहन नसून कोकणातील प्रत्येक गावागावात परंपरेनुसार शिमगा साजरा केला जातो यातच प्रत्येक गावातील ग्रामदैवत जणू भक्तांच्या घरी भेटीसाठी येत असतो, असे म्हटले जाते अस म्हणतात की जेवढ्या वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती,कोकणात शिमगा म्हणजे जेवढी गाव तेवढी संस्कृती असाच काहीसा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी समुद्रात नांगर टाकून उभे असलेल्या बोटीवर जाऊन पारंपारिक पद्धतीने धुळवड साजरी केली.
समुद्रातील बोटीवर कुटुंबीयसह पारंपारिक वाद्यावर ठेका धरला तसेच याच ठिकाणी रंगाची उधळण ही करण्यात आली, दरवर्षी शिमगोत्सव मध्ये मच्छिमार बांधव धुळवडीच्या दिवशी आपल्या बोटीवर जाऊन मित्रपरिवार व कुटुंबीयसह बहुजन ही करतात , बोटीत जाऊन देवीची पूजा केली जाते, यावेळी बोटीची पूजा केली जाते असेही पारंपारिक प्रथा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै , बंदरातील मच्छिमार बांधवाकडून जपली जात आहे
दापोल प्रतिनिधी :- मुझम्मील जैतापकर - सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह सर्वत्र होलिकोत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा होत असताना कोकणात देखील मोठ्या जल्लोषात होलिकोत्सव साजरा होत आहे,कोकणातील होलिकोत्सव म्हणजे शिमगा ज्याची असंख्य चाकरमानी आतुरतेने वाट पाहत असतात.कारण कोकणात शिमगा म्हणजे केवळ होळीका दहन नसून कोकणातील प्रत्येक गावागावात परंपरेनुसार शिमगा साजरा केला जातो यातच प्रत्येक गावातील ग्रामदैवत जणू भक्तांच्या घरी भेटीसाठी येत असतो, असे म्हटले जाते अस म्हणतात की जेवढ्या वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती,कोकणात शिमगा म्हणजे जेवढी गाव तेवढी संस्कृती असाच काहीसा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी समुद्रात नांगर टाकून उभे असलेल्या बोटीवर जाऊन पारंपारिक पद्धतीने धुळवड साजरी केली.
0 Response to "दापोली तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटीवर पारंपारिक पद्धतीने धुळवड साजरी केली."
टिप्पणी पोस्ट करा