मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारी सरपंच बिलाल अली कौचाली यांच्या खिशात..!

म्हसळा तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारी सरपंच बिलाल अली कौचाली यांच्या खिशात..!


विशेष प्रतिनिधी :- म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायत चे भ्रष्टाचारी सरपंच बिलाल अली कौचाली यांनी चुकीच्या पद्धतीने पांगळोली येथील जुने ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी अनधिकृत रित्या व्यायाम शाळा बांधण्याचं काम जोरात सुरु असताना  बिलाल कौचाली यांच्या विरोधात गट विकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे  पांगळोली ग्रामपंचायत च्या झालेल्या ग्रामसभा ठरावनुसार अनधिकृत काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पत्र व्यवहारामार्फत पांगळोली ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र या बाबतीत गेली अनेक महिने पाठपुरावा करीत असून देखील प्रशासनाकडून वेगवेगळी उत्तरे मिळत आहेत. तर आजतगायत  प्रशासकीय अधिकार्यांमार्फत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. तर आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रशासन व्यवस्थेकडून सुधारित प्रस्ताव तयार करून भ्रष्टाचारी सरपंच  बिलाल अली कौचाली यांना वाचवीनेसाठी अनेक पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे  झाल्याचे दिसून येते. याबाबत मागविलेली माहिती देण्यास प्रशासन व्यवस्थेकडून हेतूपूरत्सर दफ्तर दिरंगाई  केली जाते असे चित्र दिसून येते. तर मिळालेल्या माहितीनुसार सदर ची इमारत सरपंच बिलाल कौचाली यांच्या जबाबनुसार ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ या वादळामध्ये नुकसान ग्रस्त झाली असून मोडकलीस आली होती. मात्र त्यासोबत जोडलेल्या फोटोमध्ये सदरची इमारत ही पाडण्यात येतानाचे दृश्य दिसून येते.
    तर याबाबत म्हसळा तहसील कार्यालयातील तलाठी श्री. कलंब यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार सदरची इमारत नुकसानग्रस्त झाली असल्याचे दिसून येते. मात्र सदरचा पंचनामा हा तयार करताना २०२० रोजी झालेल्या या पंचनाम्यावर २०२१ हे साल कसे? हा प्रश्न निर्माण होत आहे. तर सरपंच बिलाल कौचाली यांनी तलाठी यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच पंचायत समिती म्हसळा चे गटविकास अधिकारी यांनी देखील उप मुख्य कार्यकारी अधि. रायगड यांच्याकडे पाठविलेल्या सुधारित प्रस्तावनुसार सदरच्या पंचनाम्याचा आधार घेऊन ही इमारत निरूपयोगी होती म्हणून पाडण्यात आली असून याबाबत कारवाई करण्याची आवश्यकता नाही असे अहवाल दिले आहेत. त्याचबरोबर रा.जी.प (बांध) उप-विभाग श्रीवर्धन यांकडे ग्रामपंचायत पांगळोली यांकडून पत्र व्यवहार करण्यात आला आहे असे देखील नमूद केले आहे.मात्र प्रथम अहवालात सदरच्या कामाबाबत कोणत्याही सक्षम अधिकऱ्यांची परवानगी न घेता तसेच कोणत्याही पद्धतीची निविदा प्रक्रिया न घेत विवेक पाखड यांना चुकीच्या पद्धतीने काम दिल्याचे नमूद केले असताना, सरपंच बिलाल कौचाली यांच्या सांगण्यावरून गटविकास अधिकारी म्हसळा आपला सुधारित अहवाल दिला असल्याचे दिसून येते. तर याबाबत महसूल कार्यालय म्हसळा मार्फत सदर तलाठी यांच्यावर कारवाई करणार का? तसेच या पंचनाम्यावर सही करणारे पंच १)नवाब अजीज कौचाली,२)शरीफ अय्युब पठाण ३)इस्माईल कासीम पठाण ४)इसाक अहमद कौचाली ५) अमजद आली ढंगू  यांवर सुद्धा प्रशासनाची दिशाभूल केले प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार का? अशी मागणी पांगळोली चे ग्रामस्थ करताना दिसून येत आहेत.

0 Response to "म्हसळा तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारी सरपंच बिलाल अली कौचाली यांच्या खिशात..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...