मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला कुलूप..!  सामान्य नागरिकांची होतेय गैरसोय.. स्वच्छतागृह  नेमकं कुणासाठी..?

म्हसळा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला कुलूप..! सामान्य नागरिकांची होतेय गैरसोय.. स्वच्छतागृह नेमकं कुणासाठी..?


म्हसळा प्रतिनिधी :- म्हसळा तालुका हा भव्य असा पसरलेला तालुका असून जवळ जवळ ८४ गावांचा आणि खेड्यांचा मिळून तयार झालेला हा म्हसळा तालुका आहे. तालुक्यातील म्हसळा हे शहराच आणि  येण्या जाण्याच्या सोयीचं ठिकाण असल्याने म्हसळा शहरात अनेक शासकीय कार्यालय असल्याचे दिसुन येते. तर म्हसळा शहरातच तालुक्याचं  तहसील कार्यालय असून तालुक्यातून अनेक खेडेगावांतून सामान्य नागरिक तहसील कार्यालयात महसूल तसेच शासकीय दाखले यांसाठी येत असतात. तर नागरिकांची प्राथमिक सुविधा म्हणून तहसील कार्यालयात स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सदरचे स्वच्छतागृह बंद असल्याने तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते. याबाबत चौकशी केली असता.हे स्वच्छतागृह  नादुरुस्त झाले असून त्यामुळे वापरासाठी बंद करण्यात आले आहे असे समजले मात्र तहसील कार्यालयातील कर्मचारी याच स्वच्छतागृहचा वापर करीत असल्याने  स्वच्छतागृह खरच नादुरुस्त आहे की सर्वसामान्य नागरिकांना त्रास व्हावा यासाठी हे बंद केले आहे.? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला दिसून येतो. 
तर एकिकडे एखाद्या पेट्रोल पंप किंवा हॉटेलच्या ठिकाणि जर प्राथमिक सुविधा म्हणून स्वच्छतागृह जर नसेल तर प्रशासकीय स्तरावर त्या मालकांविरुद्ध कारवाई केली जाते. मग तहसील कार्यालयातील या प्रकारानंतर काय कारवाई होणार का? असा प्रश्न देखील जनसामान्यांकडून येत असल्याचे दिसून येते.
   या स्वच्छतागृहाबद्दल अस्वच्छता तसेच अपुऱ्या सोयीसुविधा यांबाबत गेली २ वर्ष मी स्वतः सतत पत्र व्यवहार करीत असून वेळोवेळी तहसिल कार्यलयाकडून सदरचे स्वच्छतागृह आमच्या अखत्यारीत नसून म्हसळा नगरपंचायत यांच्या अखत्यारीत असल्याचे तत्कालीन तहसिलदार श्री.गोसावी यांनी लेखी लिहून दिले आहे.तर हे स्वच्छता गृह हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येत असल्याचे लेखी उत्तर विद्यमान तहसिलदार श्री.समीर घारे यांनी दिले आहे. मग आता हे स्वच्छतागृह कर्मचारी व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यावर बंदी घालण्याचे अधिकार तहसीलदारांना  कुणी दिले.

          तरी लवकरात लवकर स्वच्छतागृह सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी सुरू करण्यात यावे. अन्यथा तहसिलदार श्री.घारे यांच्याविरोधात आंदोलन छेडले जाईल.असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

0 Response to "म्हसळा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला कुलूप..! सामान्य नागरिकांची होतेय गैरसोय.. स्वच्छतागृह नेमकं कुणासाठी..?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...