मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यात शैक्षणिक उपक्रम राजकीय नेतेमंडळीच्या वेळापत्रकानुसार..  म्हसळा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न..!

म्हसळा तालुक्यात शैक्षणिक उपक्रम राजकीय नेतेमंडळीच्या वेळापत्रकानुसार.. म्हसळा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न..!


म्हसळा प्रतिनिधी : म्हसळा तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेला सर्व सामान्य जनतेची काम न करण्याचं जणू ग्रहण लागल्याची परिस्थिती दिसून येत असतानाच म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागात देखील सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय नेतेमंडळी,तथा लोक प्रतिनिधी यांच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रम घेत असल्या सारखे अनेक प्रश्न घर करीत असल्याचे दिसून येते.

याच कारण म्हणजे म्हसळा तालुक्यात दिनांक ३ व ४ जानेवारी २०२३ रोजी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.अगदी कोरोनाच्या २ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विज्ञान प्रदर्शन होणार असल्याने शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत होते. मात्र अचानक आचारसंहितेचे कारण देत गट शिक्षण अधिकारी यांनी सदरचे विज्ञान प्रदर्शन रद्द करत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला मात्र शैक्षणिक उपक्रमांमध्ये आचार संहितेच कारण सांगून अचानक कार्यक्रम रद्द करणे कितात योग्य आहे असा सवाल पालक तसेच शिक्षक वर्गांकडून विचारला जात असल्याचं चित्र सद्या म्हसळा तालुक्यात दिसून येते.

तर एकीकडे काही राजकीय मंडळींना आचार संहिता असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याने हा कार्यक्रम रद्द केला असल्याचे मत अनेक जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे.मात्र यामुळे विद्यार्थी वर्गाचे आणि सोबतच म्हसळा तालुक्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तालुक्यात शैक्षणिक उपक्रम राजकीय नेतेमंडळीच्या वेळापत्रकानुसार.. म्हसळा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न..!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...