
माणगाव तालुक्यातील देगाव येथील पुलाच्या विकास कामांचे भूमिपूजन. माजी सैनिकांच्या हातून भूमिपूजन सोहळा पार , समाजात एका नव्या संकल्पनेची नांदी..!
गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२
Comment
माणगांव प्रतिनिधी : काही वर्षांपासून रायगड जिल्ह्याचा विकास होत असल्याचे चित्र अनेक माध्यमांमधून पाहायला मिळत होते.मात्र माणगाव तालुक्यातील मानगाव शहराजवळच असणार्या देगाव गावच्या रस्त्यालगत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणारा हा पुल मात्र प्रवास करणाऱ्या वाहनांचे भार वाहत तसाच उभा होता. "ना त्याकडे कुणा विकासकाचे लक्ष गेले, की ना कुणा स्थानिक लोकप्रतिनिधींचे" अखेर सावित्री नदीवरील पुलाच्या अपघातानंतर २०१७ साली हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.या पूलाची दुरवस्था पाहता देगावचे सुपुत्र श्री.काशिनाथ महादेव गायकवाड यांनी पुढाकार घेऊन २०२१ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशी विभाग समन्वयक व स्थानिक लोकाधिकार समितीचे सदस्य,तसेच मा.महापौर,आमदार श्री.सुनीलजी प्रभू साहेब यांच्या माध्यमातून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री.श्री.अशोक जी चव्हाण साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा करून सदर पूलाच्या कामासाठि नाबार्ड या वित्तीय संस्थेकडून अंदाजित रक्कम रु २,३२,१९,००० एवढा निधि मंजूर करून करून घेतला.या पुलाचे भूमिपूजन माजी सैनिक श्री.विठोबा मारुती परबलकर यांच्या हस्ते दिनांक ४/१२/२०२२ रोजी करण्यात आला यावेळी गावातील गजनन गायकवाड,दिलीप गायकवाड,विजय इंगळे, हरेश गायकवाड,बाळा गायकवाड,एकनाथ गायकवाड,विलास गायकवाड,कृष्ण गायकवाड,मंगेश कदम,प्रतीक दिवेकर,मारुती गायकवाड,मंगेश गायकवाड,तेजप ठाकुर,एड.अनिकेत ठाकुर,विष्णु पवार,अशोक मर्चंडे यांसह गावातील ग्रामस्थ तसेच जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गावातील ग्रामस्थांनी कोणत्याही राजकारणी पुढार्यांना निमंत्रित करण्या ऐवजी माजी सैनिकांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतल्याने देगाव पंचक्रोशीसह मानगाव तालुक्यात देगाव ग्रामस्थांचे कौतुक होते आहे. तर आपल्या देश रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची करणार्या सैनिकांच्या हातून अशा कामाचे भूमिपूजन सारखे कार्यक्रम होताना पाहून एक छान संकल्पना समाजात रुजू होत असल्याचे दिसून येते.
0 Response to "माणगाव तालुक्यातील देगाव येथील पुलाच्या विकास कामांचे भूमिपूजन. माजी सैनिकांच्या हातून भूमिपूजन सोहळा पार , समाजात एका नव्या संकल्पनेची नांदी..!"
टिप्पणी पोस्ट करा