मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फुंडे हायस्कूल उरण पंच्याहत्तरीतील माजी विद्यार्थ्यांची नढाळ यात्रा.

फुंडे हायस्कूल उरण पंच्याहत्तरीतील माजी विद्यार्थ्यांची नढाळ यात्रा.


उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलचे १९६४ चे माजी विद्यार्थी  मागील ४० वर्षापासून दरवर्षी सहली काढत आहेत.या सहलीमध्ये वर्ग मित्रांच्या पत्नीचाही सहभाग राहिला आहे.

या वर्षी पंचायतन नढाळ येथे सहल  काढली. त्यामध्ये ४९ जणांचा सहभाग राहिला.यावेळी ई. एच.ठाकूर यांनी बांसरी वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त केले. जेष्ठ साहित्यिक तथा रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,जयवंत पाटील, रोहिदास पाटील,नर्मदा म्हात्रे, महादेव घरत, बी.डी.पाटील यांनी आपले विचार मांडले.प्रमुख अतिथी एडव्होकेट गोपाळ  शेळके यांनी 

शेळके ब्रदर्स तर्फे धनाजी भोईर आणि प्रा.एल.बी.यांचे सत्कार केले.वयोवृध्द वर्ग मित्रांचे कौतुक करून सदर उपक्रम प्रेरणादायी असल्याचे गोपाळ शेळके यांनी सांगितले.

      प्रकाश घरत यांनी शेलू कर्जत येथे आमंत्रित करून वर्ग मित्रांना सन्मानित केले.यावेळी दिवंगत मित्र आणि दिवंगत नातेवाईक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

     महिलाध्यक्ष सिताबाई कडू,रामदास म्हात्रे,शंकर कडू,पांडुरंग घरत, गंगाधर म्हात्रे,शंकर पाटील, भरत तांडेल यांनी सहलीची जबाबदारी पार पाडली भूषण ठाकूर यांनीहि या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "फुंडे हायस्कूल उरण पंच्याहत्तरीतील माजी विद्यार्थ्यांची नढाळ यात्रा."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...