मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप.

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप.


उरण  (विठ्ठल ममताबादे ) वै.इंदुबाई काशिनाथ देशमुख व वै. काशिनाथ नाना देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांच्या निवास स्थानी संत निवास ओझर खुर्द ता. संगमनेर, जि. अहमदनगर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील उलवे केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सीमा सुभाष पाटील व श्री समर्थ कृपा मेडिकलचे प्रोपाइटर चैतन्य गोवर्धन पाटील (चिर्ले -उरण) यांच्या माध्यमातून मोफत , आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषध वाटपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजाराहून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी उच्च रक्तदान मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, अस्थीरोग तपासणी, इसीजी तपासणी, ऑक्सीजन लेवल, त्वचा रोग तपासणी करण्यात आली.नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. या आरोग्य शिबीरात गोरगरिब गरजूनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याने महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर महाराज )यांनी उलवे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सीमा सुभाष पाटील व श्री समर्थ कृपा मेडिकल (चिर्ले -उरण )चे चैतन्य गोवर्धन पाटील तसेच नवी मुंबई मधील डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...