
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
Comment
उरण (विठ्ठल ममताबादे ) पोलिस भरती बाबत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. तसे परिपत्रकही महाराष्ट्र शासनातर्फे जारी करण्यात आले आहे. पोलिस भरतीची महाराष्ट्रातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सुरवात केली असून अनेकांनी ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरले होते. मात्र अनेक उमेदवारांनी फार्म भरले नव्हते, पोलिस भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व्हर डाउन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे जास्तीत जास्त यूवकांना पोलिस फॉर्म ऑनलाईन भरता यावे व कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये याकरीता महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीखेची मुदत वाढवून दिली आहे आता पोलिस भरतीचे ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबर 2022 पर्यंत भरता येणार आहे. या मुदत वाढी मूळे लाखो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे या मुदत वाढी बद्दल महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना उरण तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. पोलिस कर्मचारी अधिका-यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपूर्ण महाराष्ट्रात संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदत वाढी बाबत अनेक उमेदवारांनी आपल्या समस्या राहुल दुबाले यांच्या कानावर टाकले होते. लगेचच राहुल दुबाले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन अर्जाची मुदत वाढवावे अशी विनंती केली होती.आणि ही विनंती मान्य सुद्धा करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण तालुकाध्यक्ष वैभव पवार तसेच इतर सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. जास्तीत जास्त युवकांनी पोलीस भरतीत सामील होऊन देशसेवा करावी असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
0 Response to "महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार."
टिप्पणी पोस्ट करा