मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महसूल प्रशासन आता तरी जागे होणार का?   अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता तरी कारवाई करणार का?

महसूल प्रशासन आता तरी जागे होणार का? अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता तरी कारवाई करणार का?


दापोली प्रतिनिधी : - काही दिवसांपूर्वी आमच्या कोकण २४ न्युज च्या माध्यमातून दापोली तालुक्यातील केळशी येथील अवैध वाळू उपसा याबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती. याची दखल घेत प्रशासणाने २ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र या प्रकरणातील काही व्यक्ती आजही बिनधास्त पने फिरत आहेत. प्रशासन आमचं काही वाकड नाही करू शकत तसेच आम्ही पोलिसांना देखील घाबरत नसल्याचे सांगून चक्क प्रशासनाला आव्हान करीत असल्याचे दिसून येते.
   वाळू उपसा प्रकरणातील मिथुन चीचघरकर आणि वासिम मुकादम यांनी याच वाळू प्रकरणातील जवळ जवळ २०० ब्रास वाळू अवैध रीतीने मंदिवली परिसरात विक्री केली असल्याचे दिसून येते. मात्र या दोघांविरोधात प्रशासन एवढ शांत का ? असा सवाल मुझाम्मील जैतापकर यानी आमच्या प्रतीनिधींमार्फत प्रशासनाला विचारला आहे.

  तसेच या दोन्ही व्याक्ती विरोधात प्रशासन काही कारवाई करणार आहे कि नाही कि प्रशासनातील काही व्यक्ती आपल्या वयक्तिक स्वार्थासाठी या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याची चर्चा हि सध्या दापोली तालुक्यात रंगली असल्याचे दिसून येते. तर एकीकडे या दोन्ही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नाग्रीकांमार्फत होत असलेली दिसून येते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "महसूल प्रशासन आता तरी जागे होणार का? अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता तरी कारवाई करणार का?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...