
महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायती निवडणूक लढविण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे संकेत.
उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या उरण तालुक्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले.
आज उरण तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या सोबत झालेल्या उलवे येथील कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्यालयातील बैठकीत हे संकेत देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, प्रदेश सदस्य डॉ. मनिष पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जेष्ठ नेते महेंद्र ठाकूर, कमलाकर घरत, भालचंद्र घरत, दिपक ठाकूर, लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, श्रेयश घरत, विनोद पाटील, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या महाविकास आघाडी तर्फे उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावो गावी बैठका घेतल्या जात आहेत. आणि या बैठकांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायती निवडणूक लढविण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे संकेत."
टिप्पणी पोस्ट करा