
‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी…’, मुंबईत ‘मातोश्री’ परिसरात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर...
महाराष्ट्र,मुंबई : एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असतानाचा फोटो वापरला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या बॅनरवर क्यूआर कोड दिला आहे.
मुंबईत शिवसेनेत पुन्हा बॅनरवॉर सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे
यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात बॅनरबाजी वांद्रे भागात
सुरु झाली आहे. वांद्रे येथील ‘मातोश्री’समोरच शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले आहे. शिंदे यांच्या
शिवसेनेकडून ‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी’, असे बॅनर लावण्यात आले.
बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधतानाचा फोटोसुद्धा वापरला आहे. तसेच
या बॅनरवर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. तसेच बघताय काय? सामील व्हा, असे आवाहन शिवसैनिकांना
केले आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवबंधन
बांधत असतानाचा फोटो वापरला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न
केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या बॅनरवर क्यूआर कोड दिला आहे. एक मोबाईल क्रमांक
दिला आहे. त्यामाध्यमातून शिवसेना सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना उबाठाकडून विकास कामांचा बॅनर
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बॅनरला
उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यात वांद्रे येथील पाणी
पुरवठ्याचा विषय मांडला होता. वांद्रे पूर्वेला मिळणार ५ एम एल डी अतिरिक्त पाणी, या अशा आशयाची बॅनरबाजी शिवसेना ठाकरे पक्षाकडून लावण्यात आली आहे.
यामुळे वांद्रे येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना
आमनेसामने येतात का? असा प्रश्न विचारला जात आहे. विकास
कामांवरून आणि सदस्य नोंदणी वरून दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी केली गेली
आहे.
मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट वर्चस्वाची लढाई करत आहे. मुंबई
कोणाची? हे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. ही
निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी दोन्ही शिवसेनेकडून मुंबई मनपा निवडणुकीची
तयारी सुरु केली जात आहे. त्यामुळे मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
शिवसेना उबाठा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे.
0 Response to "‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी…’, मुंबईत ‘मातोश्री’ परिसरात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर... "
टिप्पणी पोस्ट करा