
“तुमचे कष्ट दूर करतो ” सांगत वृद्धाला लुटलं, साधूच्या वेषातील भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या...
महाराष्ट्र,डोंबिवली : देशभरातील विविध राज्यात आणि शहरात साधूबाबांच्या वेषात वयोवृद्धांना लुटणाऱ्या तीन भामट्यांना सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लुटलेले दागिने आणि एका महागडी कारही पोलिसांनी भामट्या चोरांकडून जप्त केली.
साधूच्या वेशात येऊन लोकांना गंडा घालणाऱ्या आणि त्यांना
लुटणाऱ्या भामट्यांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत चोरांना बेड्या
ठोकण्यात डोंबिवली मानपाडा पोलिसांना यश मिळालं आहे. राहुल भाटी, आशीष मदारी, लखन निकम अशी तीन
भामट्यांची नावे आहेत. ” तुमचे कष्ट दूर करतो “असे सांगत डोंबिवलीतील एका 75 वर्षीय वृद्ध इसमाला
बोलण्यात गुंतवून त्याची सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन हे भामटे पसार झाले होते.
मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचे बिंग फोडले. मानपाडा पोलिसांनी या तिन्ही
आरोपींना बेड्या तर ठोकल्याच पण त्यांच्याकडून लुटीचे दागिने आणि एक महागडी कारही
जप्त केली.
महाराष्ट्र्च नव्हे अन्य राज्यातही
नागरिकांची केली लूट
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही चोरांनी फक्त डोंबिवली तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात
आणि देशातील अन्य शहरातही चलाखी करत नागरिकांना लुटले होते. या तिघांनी अशाप्रकारे
आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून याप्रकरणी
पोलीस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र्च नव्हे अन्य राज्यातही
नागरिकांची केली लूट
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही चोरांनी फक्त डोंबिवली तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात
आणि देशातील अन्य शहरातही चलाखी करत नागरिकांना लुटले होते. या तिघांनी अशाप्रकारे
आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून याप्रकरणी
पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Response to "“तुमचे कष्ट दूर करतो ” सांगत वृद्धाला लुटलं, साधूच्या वेषातील भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या... "
टिप्पणी पोस्ट करा