शिवरायांचा एकेरी उल्लेख, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा; संजय राऊत यांची अमित शाहांवर टीका...
महाराष्ट्र : अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमावरून संजय राऊत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख "समाधी" म्हणून केल्याबद्दल त्यांनी तिखट टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल रायगड जिल्ह्याच्या
दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांची काल तिथीनुसार पुण्यतिथी होती.
त्यानिमित्ताने त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला
अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका.
छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे अमित शाह यांनी भाषणादरम्यान म्हटले. अमित शाह यांच्या
रायगड दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना
अमित शाहांच्या रायगड दौऱ्याबद्दल विचार करण्यात आली. त्यावर संजय राऊतांनी
जबरदस्त टोला लगावला. काल अमित शाहांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा
मिळाला, पण देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या तोंडून काहीही निघालेलं नाही, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
रायगडसारख्या जिल्ह्यात तुम्ही महायुती
म्हणून एकोपा दाखवू शकला नाहीत. मी पाहिलं की एसंशि गटाचे लोक स्नेह भोजनाला
नव्हते. छत्रपतींबद्दलचे ज्ञान अमित शाहांकडून घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली
नाही. छत्रपती काय होते, त्यांचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती, महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वैगरे
वैगरे.. ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाने सुडाने कारवाया
केलेल्या आहेत, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले
छत्रपतींचे वंशज आणि लोक माना डुलवणार, या राज्यावर अद्याप इतकी वाईट वेळ आलेली
नाही, असे संजय राऊत म्हणाले.
गुजरातच्या
या नेत्यांना एवढं प्रेम आहे का त्याच्याविषयी
“गेले तीन महिने यांचेच लोक थडगं उकरून टाकण्याच्या विचाराने भारावून
गेले होते. औरंगजेबाची कबर राहता कामा नये, ते उकरुन टाकू. त्यासाठी राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोचे प्रदर्शन केले. त्यातून
लोकं पेटले, भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो, त्याचा उल्लेख काल देशाचे गृहमंत्री
अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर केला. त्यात त्यांनी
औरंगजेबाची समाधी असं म्हटलं. त्यांनी त्याला थेट समाधीचा दर्जा दिला, बरं का नकली हिंदूत्ववाद्यांनो, औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या
गृहमंत्र्यांनी काल रायगडावरुन छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला, यासारखे या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार… ते काल झालं”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“मग इतक्या हाणामारी दंगली का घडवल्या, गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला
त्याचा हा परिणाम आहे का, एवढं हे प्रेम. औरंगजेबाचा जन्म
गुजरातमध्ये झाला त्यामुळे गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का
त्याच्याविषयी”, असा सवालही संजय राऊतांनी केला.
हे या महाराष्ट्राचे दुर्दैव
“महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या समाधीला
थडग्याचा दर्जा देण्याचे वक्तव्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या
तोंडून आले. त्यावेळी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. त्यांना या गोष्टीचा
त्रास व्हायला होता. छत्रपती शिवरायांचे दोन्हीही चाहते एसंशि, देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्यांनाही यावर आक्षेप घ्यावा
असं वाटलं नाही. जर दुसऱ्या कोणी हा शब्द काढला असता तर वर जे त्रिकुट होतं
त्यातील अजित दादा संयमी आहेत. पण इतर दोघांनी नुसता थयथयाट केला असता. काल अमित
शाहांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा मिळाला, पण त्यांच्या तोंडून काहीही निघालेलं नाही, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.
0 Response to "शिवरायांचा एकेरी उल्लेख, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा; संजय राऊत यांची अमित शाहांवर टीका... "
टिप्पणी पोस्ट करा