मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

धक्कादायक, निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, दुसरीकडे हायवे वर प्रवाशांना लुटलं, महिलांना मारहाण...

धक्कादायक, निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, दुसरीकडे हायवे वर प्रवाशांना लुटलं, महिलांना मारहाण...


महाराष्ट्र :
 महाराष्ट्रात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका निवृत्त मुख्याध्यापकाने टोकाचं पाऊल उचललं. त्याने पत्नीचा खून केला नंतर स्वत:च जीवनही संपवलं. दुसरीकडे महाराष्ट्रातील एका हायवे वर प्रवाशांना लुटण्यात आलं. महिलांना मारहाण करण्यात आली.

नाशिकच्या जेलरोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीला मारल्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुरलीधर जोशी (78) व लता जोशी अशी मृतांची नाव आहेत. दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. या जोडप्याची दोन मुलं मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. नाशिक येथे मुरलीधर जोशी व लता जोशी अपार्टमेंटमध्ये दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या.

दीर्घ आजारपणामुळे हे दांपत्य कंटाळलं होतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी म्हटलं आहे की, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे. आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीपोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त होत आहे.

दुसरी घटना, हायवे वर प्रवाशांची लूट

दुसरीकडे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करत लुट केल्याची घटना घडली आहे. तुळजापूर आणि धाराशिवच्यामध्ये कावलदरा येथील परिसरात पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान घटना घडली. जवळपास 4 ते 5 गाड्यांना अडवून त्यातील महिला व प्रवासी यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती. सोने, मोबाईल व इतर वस्तू चोरुन प्रवाशांना मारहाण केल्याची माहिती. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लूट केली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरु आहे.

गाड्या कशा अडवल्या?

गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. धावत्या वाहनासमोर लोखंडी वस्तू टाकून गाड्या अडवण्यात आल्या. टायर फोडून आतील प्रवाशांची लूट करण्यात आली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

 

0 Response to "धक्कादायक, निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, दुसरीकडे हायवे वर प्रवाशांना लुटलं, महिलांना मारहाण... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...