मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोने -चांदीची लूटमार! Gold @ 90,000 रुपये, ग्राहकांना फुटला घाम, किंमत तरी काय?

सोने -चांदीची लूटमार! Gold @ 90,000 रुपये, ग्राहकांना फुटला घाम, किंमत तरी काय?


महाराष्ट्र :
 या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीने ग्राहकांना आनंदवार्ता दिली. तर दुसर्‍या दिवशी ग्राहकांच्या खिशावर दरोडा घातला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

सोने आणि चांदीने आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा दिला. सोमवारी दोन्ही धातुत घसरण झाली. तर त्यानंतर दोन्ही धातुनी ग्राहकांच्या खिशावर दरोडा घातला. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुनी ग्राहकांना घाम फोडला होता. तर आता दोन्ही धातुनी पुन्हा चमक दाखवली. या धातुची धुळवड संपली नसल्याचे दिसून येते. दोन्ही धातुनी महागाईचे रंग उधळले आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या

थोडा ब्रेक, सोन्याची मोठी झेप

गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी महागले होते. या सोमवारी सोने 110 रुपयांनी कमी झाले. तर मंगळवारी सोने 440 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची तुफान बॅटिंग

मागील दोन आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. चांदी या 14 दिवसात 5 हजारांनी महागली होती. तर 1100 रुपयांनी स्वस्त झाली होती. सोमवारी चांदी 100 रुपयांनी कमी झाली. मंगळवारी 1100 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,04,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,354, 23 कॅरेट 88,000, 22 कॅरेट सोने 80,932 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,266 रुपये, 14 कॅरेट सोने 51,687 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,400 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

 

0 Response to "सोने -चांदीची लूटमार! Gold @ 90,000 रुपये, ग्राहकांना फुटला घाम, किंमत तरी काय?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...