मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय...

दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय...


महाराष्ट्र,मुंबई :
 देशा सालियान मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली आहे. तर नवीन तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांकडे दिली आहे. यामध्ये डिनो मोरियो, सुरज पांचाली, आदित्य ठाकरे, अंगरक्षक यांच्यासह इतरांना आरोपी करण्याची विनंती त्यांनी तक्रारीत केली होती. या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. या नवीन दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे.

आत्महत्या की हत्या?

मालवणी पोलिसांनी यापूर्वीचा दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. आतापर्यंत या प्रकरणात राजकारण करण्यात येत असले तरी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे ही देण्यात आली आहे.

सतीश सालियान यांच्या अडचणी वाढणार?

मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार, दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातून ते एका महिलेला पैसे देत होते. ते सारखे दिशाकडे पैशांची मागणी करत होते. दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. याविषयी तिने मित्रांना सुद्धा सांगितले होते, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टने या प्रकरणाची दिशाच बदलल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने सखोल तपासाची मागणी करण्यात येत आहे.

हे तर सूडाचे राजकारण

मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. याप्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध नसताना त्यांचे नाव सातत्याने घेण्यात येत आहे. याप्रकरणाचे राजकीय भांडवल करण्यात येत आहे. सूडाच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. नारायण राणे यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सादर करावेत, असे आवाहन ही त्यांनी केले.

 

0 Response to "दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...