राजस्थान-केकेआरचा दुसरा सामना, कोण उघडणार विजयाचं खातं?
कोलकाता,राजस्थान : कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघाच रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) पहिली फेरी पूर्ण झाली आहे. एकूण 10 संघांनी प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. आता या
स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला 26 मार्चपासून सुरुवात होत
आहे. या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा या
मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांची या हंगामात पराभवाने सुरुवात झालीय.
बंगळुरुने कोलकाताला 22 मार्चला पराभूत केलं. तर
हैदराबादने राजस्थानवर 23 मार्चवर विजय मिळवला. आहे.
या सामन्यात एका संघाचं विजयाचं खात उघडेल. तर एका संघाला सलग दुसऱ्या पराभवाला
सामोरं जावं लागेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात विजयाचं खातं उघडण्याची
चुरस पाहायला मिळणार आहे.
राजस्थान
रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना केव्हा?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट
रायडर्स सामना बुधवारी 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
राजस्थान
रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट
रायडर्स सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे.
राजस्थान
रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट
रायडर्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
राजस्थान
रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट
रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
राजस्थान
रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट
रायडर्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.
0 Response to "राजस्थान-केकेआरचा दुसरा सामना, कोण उघडणार विजयाचं खातं?"
टिप्पणी पोस्ट करा