मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडेंची दांडी, अजित पवारांकडून शरद पवारांना जोरदार झटका...

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडेंची दांडी, अजित पवारांकडून शरद पवारांना जोरदार झटका...


महाराष्ट्र : 
आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात होणार आहे.

आगामी महापालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यातच आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत. नुकतंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

सतीश चव्हाण करणार अजित पवार गटात प्रवेश

तर दुसरीकडे आज शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण हे आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनाला सतीश चव्हाण हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र माघारी घेतले आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन दिवसीय अधिवेशनात त्यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे २ दिवसीय शिबिराचे वेळापत्रक समोर आले आहे. यात आज पहिल्या दिवशी सुनील तटकरे, संदीप चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, अभिनेते सयाजी शिंदेनजीब मुल्ला, सिद्धार्थ कांबळे, नवाब मलिक हे उपस्थित असतील. तर दुसऱ्या दिवशी अभिजीत करंडेप्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार आणि विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ हे नेते उपस्थित असणार आहेत.

मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी

दरम्यान राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन शिर्डीत होणार आहे. या अधिवेशनाच्या ठिकाणास यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आजी माजी आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बँनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प अधिवेशनला नाराज असलेले छगन भुजबळ हजर राहणार आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरुन आज ते शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

0 Response to "राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडेंची दांडी, अजित पवारांकडून शरद पवारांना जोरदार झटका... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...