
संतोष देखमुखांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार...
महाराष्ट्र : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहेत. या चौकशीत विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची...
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख
यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या
घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली
आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहेत. या चौकशीत विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता
दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
आहेत. यावेळी ते मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडणार
आहेत.
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि इतर
बाबींवर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी संतोष देशमुख
यांचे कुटुंब त्यांची बाजूही मांडणार आहेत. या भेटीसाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी
पुढाकार घेतला आहे.
तर दुसरीकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख
हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
घेणार आहेत. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली
आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांना ग्राऊंड रिअॅलिटी सांगणार, असे म्हटले आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांची भेट घेतली असे
म्हटले जात आहे.
0 Response to "संतोष देखमुखांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार... "
टिप्पणी पोस्ट करा