मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पोलीस भरतीची तयारीसाठी गेले अन् होत्याचं… बीडमध्ये एसटी बसने तिघांना चिरडलं...

पोलीस भरतीची तयारीसाठी गेले अन् होत्याचं… बीडमध्ये एसटी बसने तिघांना चिरडलं...


महाराष्ट्र,बीड :
 आज पहाटे बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना एका भरधाव एसटी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आज पहाटे बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना एका भरधाव एसटी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते तिघेही पोलीस भरतीची तयारी करत होते. या अपघातामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर हा अपघात घडला. बीडमधून परभणीत एक एसटी बस जात होती. त्यावेळी बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाट्याजवळ पाच जण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी गेले होते. यावेळी हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.

0 Response to "पोलीस भरतीची तयारीसाठी गेले अन् होत्याचं… बीडमध्ये एसटी बसने तिघांना चिरडलं... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...