लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...
महाराष्ट्र : आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नहाी. हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार ? असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही
गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश
मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण
योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन
महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा
वाढीव हफ्ता मिळालेला नाही. आता या लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार
याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या
हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रातीला
येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता
देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील
हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण
योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील
हफ्तासाठी वाट पाहावी लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या रकमेचा निर्णय कधी होणार
याकडे बहिणींचं लक्ष लागले आहे.
आतापर्यंत
किती महिलांना पैसे मिळाले ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत
पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर असे ६ महिन्यांचे पैसे जमा झाले आहे.
यातील प्रत्येक महिन्याला 1500 असे मिळून एकत्रित 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभरातील सुमारे
अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर
आलेली नहाी. हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे
जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार ? असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास
सुरूवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मार्च
महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार
केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत
सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.
0 Response to "लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर... "
टिप्पणी पोस्ट करा