मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुंबईतील वांद्रे परिसरात पोर्शे कारचा अपघात, बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप...

मुंबईतील वांद्रे परिसरात पोर्शे कारचा अपघात, बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप...


महाराष्ट्र,मुंबई :
 आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही कार 19 वर्षीय तरुण चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह महाराष्ट्रात अपघाताचे प्रकरण सातत्याने वाढत आहे. त्यातच आता मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही कार 19 वर्षीय तरुण चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या वांद्रे परिसरातील साधू वासवानी चौकात एक भीषण अपघात घडला. शनिवारी पहाटे एका भरधाव पोर्शे गाडीने फूटपाथजवळ उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. यावेळी ही पोर्शे कार 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

या व्हिडीओत पहाटेच्या सुमारास पोर्शे कार ही भरधाव वेगात साधू वासवानी चौकातून जाताना दिसत आहे. अचानक ही कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की काही दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने ही कार झाडावर आदळ्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. या गाडीत चार जण होते. ही गाडी 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रीणही याच गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात कुणीही जखमी झालं नसलं तरी दुचाकींचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं

0 Response to "मुंबईतील वांद्रे परिसरात पोर्शे कारचा अपघात, बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...