मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन...

शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन...


महाराष्ट्र,मुंबई : 
शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. बाबरी प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावर आरोपपत्र दाखल होते. त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती.

शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते शिवसेनेचे होते आणि राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते.

ठाण्याचे पहिले महापौर

काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची १९८० साली स्थापन केले होती. माजी खासदार, ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष, पाहिले महापौर राहिले आहेत. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती.त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे.

बाबरी मशीद प्रकरणातून निर्दोष मुक्तता

बाबरी प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावर आरोपपत्र दाखल होते. त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यांनी कोर्टात म्हटले होते, “मी लालकृष्ण अडवाणी आणि मनोहज जोशी यांना जमावाला नियंत्रित करताना, त्यांना शांत करताना आणि पुढे जाण्यापासून रोखताना पाहिले होते. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावाच्या उद्रेकामुळे बाबरी मशीदची घटना घडली.

 

0 Response to "शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...