मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 ‘आज दुपारी 1 वाजेपर्यंत…’, शपथविधीआधी संजय शिरसाट यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती...

‘आज दुपारी 1 वाजेपर्यंत…’, शपथविधीआधी संजय शिरसाट यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती...


महाराष्ट्र :
 शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? या बद्दल स्पष्टता नव्हती. पण आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सस्पेन्स संपवला आहे.

राज्यात प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा आज शपथविधी आहे. मुंबईच्या आझाद मैदानात संध्याकाळी पाचच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काल रात्रीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? या बद्दल स्पष्टता नव्हती. पण आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सस्पेन्स संपवला आहे. एकनाथ शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे नक्की आहे. जर यदा कदाचित शक्यता अशी पण आहे की, तिन्ही नेत्यांच एकत्रित काही ठरलं, तर दुपारी 1 वाजेपर्यंत एखादा निर्णय आला तर काही मंत्री शपथ घेतील. आताच्या घडीला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे नक्की आहेअसं संजय शिरसाट म्हणाले. तुम्ही मंत्रिपदासाठी इच्छुक आहात, तुमचे इतर सहकारी इच्छुक आहेत, तुम्ही रात्री वर्षा बंगल्यावर होता, काही निरोप आला का? त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणालाही फोन आलेला नाही. शिवसेनाच नाही, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला वरिष्ठ नेत्यांचा फोन गेलेला नाही. म्हणून हालचाली सुरु आहेत, बोलणी सुरु आहेत, आमदाराला सिग्नल दिलाय असं काही कारण नाही

आज इतर मंत्र्यांना शपथ नाही, मग कधी?

निर्णय प्रक्रिया जवळ आल्यानंतर असे फोन येत असतात. आतापर्यंत कोणाला फोन गेलेला नाही, याचा अर्थच तीन लोक शपथ घेतील. पण काही घडलच, तर सांगता येत नाही, त्याची शक्यता नाकारता येत नाहीअसं संजय शिरसाट म्हणाले. आज जर इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. अधिवेशनाआधी किती तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी 12 किंवा 13 डिसेंबरपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं सांगितलं.

0 Response to " ‘आज दुपारी 1 वाजेपर्यंत…’, शपथविधीआधी संजय शिरसाट यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...