.webp)
दोन ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा; शरद पवार म्हणाले, मी अस्वस्थ…
महाराष्ट्र,पुणे : शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार आज पाडव्याच्या दिवशी भेटायला का आले नाहीत? यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा...
दोन पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. चांगली गोष्ट
आहे. मला आनंद आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा या
ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणात आम्ही सर्वजण जमतो. ही जुनी पद्धत आहे. ही
कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. ठिक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं.
त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असं शरद पवार म्हणालेत.
आमच्या कुटुंबातील सर्व लोक पाडव्याच्या आदल्या दिवशी येतात. काल
सर्व होते. अजितदादा काही कामामुळे आले नसतील. त्यांना वेळ मिळाला नसेल. पण सर्व
होते. त्यांच्या दोन बहिणी इथेच होत्या. बाकी सगळे जण होते. काही काही वेळा
कामामुळे माझ्याकडूनही उशीर व्हायचा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आले.
नागपूर, बुलढाणा, गडचिरोली, कोकणातील मुंबई, मराठवाड्यातील अनेक लोक भेटले. अनेक तालुका आणि जिल्ह्यातील लोक आले.
यावेळी नेहमी पेक्षा अधिक लोक आले, असं शरद पवारांनी म्हटलं.
0 Response to "दोन ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा; शरद पवार म्हणाले, मी अस्वस्थ…"
टिप्पणी पोस्ट करा