मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण? भाजप चाणक्य अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले…

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण? भाजप चाणक्य अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले…


महाराष्ट्र,मुंबई :
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे ऐवजी अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष दिला असता तर हे दोन्ही पक्ष फुटले नसते.

 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. दोन्ही आघाडी आणि युती सरकारकडून मुख्यमंत्री कोण? याबाबतचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकला जात आहे. महाविकास आघाडीकडून आधी महायुतीने मुख्यमंत्री कोण होणार? हे सांगावे मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असे म्हटले जात आहे. आता महायुतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीचे पुढील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. भाजपचा संकल्पपत्राचे प्रकाशन रविवारी झाले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह यांनी पुढील मुख्यमंत्री कोण? हे सांगितले.

संकल्पपत्र असे लागू होणार

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. महायुतीची सरकार आल्यावर तीन पक्षांची कमेटी बनणार आहे. ती कमेटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.

सर्वाधिक दंगे काँग्रेसच्या काळात

महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतरविरोधात कठोर कायदा करणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्याबाबत टीका केली. ते म्हणाले. काँग्रेस सरकार असताना शेतमाल किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डाटा डाऊनलोड करुन पाहा. तसेच राज्यात सर्वाधिक जास्त दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये झाले आहेत.

संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले आहे. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसची सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही. पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमित शाह यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी यामुळे फुटली

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष का फुटला ते अमित शाह यांनी सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षापेक्षा परिवारास प्राधान्य दिले, यामुळे पक्ष फुटला. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे ऐवजी अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष दिला असता तर हे दोन्ही पक्ष फुटले नसते. त्यांना कधीतरी परिवार बाजूला ठेऊन पक्षाला प्राधान्य द्यावा लागणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

 

0 Response to "महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण? भाजप चाणक्य अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले…"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...