मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना...

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना...

नागपूर : नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली. पती- पत्नी आणि दोन्ही मुलांचा समावेश आहे. ही हृदयदायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. विजय मधुकर पाचोरी (६८), माला विजय पचोरी (५५), गणेश विजय पचोरी (३८) आणि दीपक विजय पचोरी (३६) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक असून पत्नी माला आणि दोन्ही मुले गणेश आणि दीपक यांच्यासोबत राहत होते. विजय यांनी एक सोसायटी उघडली होती. त्यामध्ये अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, ती सोसायटी बुडाली. अनेकांनी पैशासाठी तगादा लावला. या संदर्भात काही गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रारी केल्या. पोलिसांनी विजय यांचा मुलगा गणेशला अटकसुध्दा केली होती. तो नुकताच कारागृहातून सुटून आला होता.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कुटुंब तणावात होते. त्यामुळे घरात पती आणि पत्नीमध्ये वाद सुद्धा होत होते. घरातील वाद एवढ्यात बरेच वाढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी व्यवसायासाठी सोसायटीमधील पैसे वापरल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यामुळे घरात ताणतणाव वाढला होता. गेल्या एका आठवड्याभरापासून कुटुंबातील वातावरण बिघडले होते. आता न्यायालयातून संपत्ती जप्तीचे आदेश आले होते.

बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या

विजय पचोरी यांच्याघरी लोक पैसे मागायला येत होते. सतत पैसे मागण्याचा तगादा आणि कुटुंबाची होणारी बदनामी बघता कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

0 Response to "धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...