मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!


महाराष्ट्र: 
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं,  असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार, तर अजित दादा शिव-शाहू फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार असल्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी प्रयत्न सोडणार नाही

अमोल मिटकरी म्हणाले की, मध्यंतरी आपण या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे या संदर्भात प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही, असे मिटकरी म्हणाले. दुसरीकडे, 13 ऑक्टोबर रोजी अकोला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित अकोल्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्याने चर्चा रंगली आहे. 

अजितदादा कुठेही नाराज नाहीत

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेल्याची चर्चा होती. यावर ते म्हणाले की, अजितदादा कुठेही नाराज नाहीत. महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जातात. मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेले काही अधिकारी माध्यमांना अशा बातम्या देतात. 

मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे

ते म्हणाले कीअकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील जनतेचा आपल्यावर उमेदवारीसाठी दबाव आणि आग्रह आहे. सध्याच्या भाजप आमदारांबद्दल लोकमानसामध्ये नाराजीची भावना असल्याची जनतेची माहिती आहे. अकोट ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे. याबद्दल पक्षाध्यक्ष अजित दादांकडे म्हणनं मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

0 Response to "अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...