
सूरज चव्हाण याने केला अत्यंत मोठा ‘तो’ खुलासा, थेट म्हणाला, घराला…
महाराष्ट्र: 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा काही दिवसांपूर्वीच फिनाले पार पडला. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका केला. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी पाचला होस्ट करताना दिसला. रितेशचा नवीन अंदाज लोकांना आवडताना दिसला. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय.
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसले. विशेष
म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच एक मोठी क्रेझ ही बघायला
मिळाली. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये धमाल करत होते. टीआरपीमध्येही जबरदस्त
अशी कामगिरी या सीजनने केली. बिग बॉस मराठीमध्ये वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांच्यासारखे दिग्गज कलाकार सहभागी झाले. मोठे वाद, आरोप प्रत्यारोप हे बघायला मिळाली. रितेश देशमुख हा
पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना दिसला. रितेश देशमुखचा खास आणि नवा अंदाज प्रेक्षकांना
जबरदस्त आवडला. आता काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीचा फिनाले झाला असून सूरज
चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरलाय.
बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निकी तांबोळी हे टॉप 3 मध्ये पोहोचले होते. सूरज आणि अभिजीत हे टॉपमध्ये पोहोचले आणि सूरज
हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला. सूरज चव्हाण याच्यावर
काैतुकांचा वर्षाव केला जातोय. लोक सतत सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सूरज
चांगलाच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.
सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता
झाल्यानंतर अभिजीत सावंत याच्यासोबत सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला होता. त्यानंतर
सूरजने थेट आपले गाव गाठले. यावेळी गावकऱ्यांनी सूरज चव्हाण याचे जोरदार स्वागत
केले. विशेष म्हणजे थेट डिजे लावून सूरजचे स्वागत गावात करण्यात आले. त्याचे अनेक
फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
आता सूरज चव्हाण याच्याकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात
आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असतानाच त्याच्याकडून सांगण्यात आले की, त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाहीये. बिग बॉसच्या घरातून बाहेर
पडल्यानंतर आपण घर बांधणार आहोत. आता त्याबद्दलच अत्यंत मोठे अपडेट हे सूरज चव्हाण
याच्याकडून देण्यात आले.
सूरज हा बारामतीमधील मोढवे या गावचा
रहिवासी आहे. सूरजने म्हटले की, मी आता माझे घर गावात बांधणार आहे आणि
मी माझ्या घराला नाव बिग बॉस देणार आहे. फक्त घरच नाही तर घराला काय नाव देणार हे
देखील सूरजने सांगून टाकले आहे. स्वत:चे एक चांगले घर असावे हे आपले स्वप्न
असल्याचे सांगताना सूरज चव्हाण हा दिसला होता. आता खरोखjच लवकरच सूरजचे घर होणार आहे.
0 Response to "सूरज चव्हाण याने केला अत्यंत मोठा ‘तो’ खुलासा, थेट म्हणाला, घराला…"
टिप्पणी पोस्ट करा