मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विधानसभा जागा वाटप, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, महायुतीचा पेपर असा सुटला…आता…

विधानसभा जागा वाटप, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, महायुतीचा पेपर असा सुटला…आता…

 


महाराष्ट्र :  निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. आता विधानसभा निवडणुकीत हा फेक नॅरेटिव्ह ब्रेक झाला आहे. फेक नॅरेटीव्ह पूर्णपणे संपला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजूनही निश्चित झालेले नाही. दुसरीकडे मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मनौधर्य उंचावले आहे. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. आमचा ८० टक्के पेपर सोडवला आहे. २० टक्के पेपरही लवकरच सोडवणार आहोत. तो सोडवला गेला की त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल.

नागपूरसाठी १३ हजार कोटींची

नागपूर विमानतळाचे आज भूमीपूजन होत आहे. नागपूरला देशातील आधुनिक विमानतळ होत आहे. त्यात कॉगो आणि प्रवाशी विमानतळ होत आहे. नागपूरसाठी १३ हजार कोटींची कामे करत आहोत.ओबीसीसाठी एकाच दिवशी ५२ हॉस्टेलचे उद्घघाटन करत आहोत. ज्या ठिकाणी हॉस्टेल झाले नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणाची व निवास भत्याची सुविधा देत आहोत.

 

0 Response to "विधानसभा जागा वाटप, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, महायुतीचा पेपर असा सुटला…आता…"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...