मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मोठी बातमी : रावसाहेब दानवे विधानसभा लढवणार?; म्हणाले, पराभूत झालो असलो तरी…

मोठी बातमी : रावसाहेब दानवे विधानसभा लढवणार?; म्हणाले, पराभूत झालो असलो तरी…


महाराष्ट्र:
 विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. रावसाहेब दानवे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. दानवे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारूण पराभव झाला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. आता राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील लढतील, अशी चर्चा होत आहे. यावर आता स्वत: रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पराभूत झालो असलो तरी पक्षाने मला पद दिलं आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं रावसाहेब दानवे म्हणालेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केव्हा ही होऊ शकते. आता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली म्हणजे केव्हा ही निवडणूक जाहीर होईल. राजकीय पक्षांनी मैदान साफ करण्यासाठी सुरुवात केली आहे, असं दानवे म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या पुन्हा दिल्लीत बैठक आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल, यादी ठरवली जाईल. 40 दिवस आधी उमेदवार घोषित करत नाही. त्यांनी केले नाही आम्ही पण केले नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा बैठक घेणार तेव्हा यादी जाहीर होणार आहे, असं दानवे म्हणाले आहेत.

0 Response to "मोठी बातमी : रावसाहेब दानवे विधानसभा लढवणार?; म्हणाले, पराभूत झालो असलो तरी…"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...