मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी...

झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी...


महाराष्ट्र,मुंबई: 
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे. सलमान खान यांचा खास मित्र म्हणून सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगने केला आहे.

माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.

थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.


0 Response to "झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...