मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ…, असं का म्हणाले अमिताभ बच्चन?

ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ…, असं का म्हणाले अमिताभ बच्चन?


महाराष्ट्र,मुंबई: 
ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा, सूनेबद्दल असं काय म्हणाले होते अमिताभ बच्चन, 'ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ...', गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची सर्वत्र चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या तिच्या सासरच्या मंडळींसोबत जलसाबंगल्यात राहत नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे ऐश्वर्या मुगली आराध्या हिच्यासोबत वेगळी राहते अशा चर्चा देखील सर्वत्र रंगल्या. पण ऐश्वर्या अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही. दरम्यान, बच्चन कुटुंबासाठी ऐश्वर्या राय अशुभ आहेअशा चर्चा देखील एकेकाळी रंगल्या होत्या. ज्यावर खद्द बिग बींनी मोठं वक्तव्य केलं होतं.

सांगायचं झालं तरऐश्वर्या अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केलं. तेव्हा ऐश्वर्या अभिषेक यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासाठी अशुभ आहे. तिला मंगळ आहेत्यामुळे अभिनेत्रीचं पहिलं लग्न एका झाडासोबत झालं, त्यानंतर अभिषेकसोबत अशा देखील अनेक चर्चा रंगल्या.

रंगणाऱ्या चर्चांवर मौन सोडत अमिताभ बच्चन यांनी रंगणाऱ्या सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं. कोणी कोणासाठी शुभ-अशुभ नसतं. जे नशिबात लिहिलं आहे तेच होणारयासर्व चर्चांना ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यावर वाईट परिणाम होत आहे. लग्न दोघांचं असतं. ते पती-पत्नी आहेत आणि कायम राहातील.असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानंतर ऐश्वर्या अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच, अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त कोन बनेगा करोडपतीशोच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या प्रेक्षकांना एक व्हिडीओ दाखवण्यात आला.

व्हिडीओमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, अभिषेक बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा आणि आराध्या बच्चन देखील होती. पण व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय नव्हती. ज्यामुळे, पुन्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

0 Response to "ऐश्वर्या राय आमच्यासाठी अशुभ…, असं का म्हणाले अमिताभ बच्चन?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...