“कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा...
महाराष्ट्र,मुंबई: बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मूळापासून नेहमी घट्ट असतं. मुलं जशी मोठी होतात, तशी त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते. अर्थात, त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो. आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत-नकळत त्यांचं घराकडे, घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं. अशाच स्वत:ला कामात, जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या वडिलांना जेव्हा मुलाच्या आधाराची गरज असते तेव्हाच जर तो ऐन तारुण्यात वाईट वळणाला गेला, तर त्या बिचाऱ्या बापाला जो चिंतेचा घोर लागत असेल आणि त्यामुळे त्याच्या काळजात किती कालवाकालव होत असेल? जरा विचार करा.
वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट
संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या
कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. अशाच एका मुलानं केलेल्या
चुकीच्या गोष्टींमुळे वडिलांवर आपल्याच मुलाविरोधात जाहिरात देण्याची वेळ आली आहे.
या जाहिरातीवर लिहिलेला मजकूर पाहून तुम्हीही म्हणाल की, अशी वेळ कोणत्याच वडिलांवर येऊ नये. या जाहिरातीवर “माझा मुलगा दीपक बाळू मोरे; वय वर्ष २२, रा. प्रभाकर वस्ती, बुधवार पेठ, सोलापूर हा वाईट लोकांच्या संगतीने बिघडला असून, लोकांकडून उधार उसनवारीच पैसे घेणे, दारू पिणे, जुगार खेळणे आदी व्यसनांत
तो गुरफटला आहे. याअगोदरही त्याने अनेकांकडे केलेली उधार उसनवारी आणि व्याजाने
घेतलेले पैसे आम्ही अनेक पट रक्कम देऊन फेडली आहे. परंतु, आता त्याने घेतलेल्या रकमेची अथवा केलेल्या व्यवहाराची
जबाबदारी आमची राहिली नसून, यापुढे कोणीही त्याच्याशी
आर्थिक व्यवहार करू नये. केल्यास त्याची जबाबदारी वडील या नात्याने माझ्यावर अथवा
माझ्या परिवारातील सदस्यांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस दिली,” असा मजकूर लिहिलेला आहे.
0 Response to "“कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा... "
टिप्पणी पोस्ट करा