मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अजितदादांचा पहिला उमेदवार ठरला, विधानसभेसाठी ‘हा’ शिलेदार रिंगणात...

अजितदादांचा पहिला उमेदवार ठरला, विधानसभेसाठी ‘हा’ शिलेदार रिंगणात...


महाराष्ट्र: 
भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपानं आघाडी घेत रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गोटात देखील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता कोणत्याही क्षणी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी जे इच्छूक आहेत, त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवेगिरी बंगल्यावर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मला खूप आनंद झाला आहे, आज पक्षाकडून नवापूर मतदार संघासाठी उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार यांनी मला अनेक सूचना केल्या आहेत. २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याकरिता सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. माझे वडील माणिकराव गावित हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सलग 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. त्यामुळे मला अजित पवार यांनी वेळोवेळी मदत केली आहे. काँग्रेस पक्षाचं आव्हान मला वाटत नाही, माझा जनसंपर्क मोठा आहे. आज अजित पवार यांनी अनेक विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी काम करत राहणार असं गावित यांनी म्हटलं आहे.

0 Response to "अजितदादांचा पहिला उमेदवार ठरला, विधानसभेसाठी ‘हा’ शिलेदार रिंगणात... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...