माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड...
मोहोळचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी
अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या
अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा
दर्जा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन
पाटील यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवड झाल्याने राजन पाटलांचे पारडे जड झाले
आहे. तर मोहोळ मधील जन सन्मान यात्रेत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी राजन
पाटलांना न्याय दिला नसल्याचे विधान केले होते. मात्र लवकरच राजन पाटील राज्याच्या
राजकारणात दिसतील असेही विधान केले होते. राजन पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचे
पक्षातील वर्चस्व कमी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उमेश पाटील
आणि राजन पाटील असा संघर्ष राजकीय वर्तुळात पाहायला मिळाला होता. सोलापूर
मध्यवर्ती जिल्हा बँक बुडवणाऱ्या तात्कलीन चेअरमनला सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ
अनुभव असलेली व्यक्ती या राजन पाटीलला सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव फक्त ते
सहकार क्षेत्र बुडवण्याचा अधिकार आहे,
असे
म्हणत उमेश पाटील यांनी राजन
पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
0 Response to "माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड..."
टिप्पणी पोस्ट करा