
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार. - रूपालीताई चाकणकर
सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४
Comment
उरण : यशश्री शिंदे या उरण मधील तरुणीची एका नराधमाने अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली. या निर्घृण खुणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ पसरली होती. अत्याचार करणाऱ्या व यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष व विविध संघटना व संस्थांनी उरण पोलीस स्टेशन वर मोर्चा देखील काढला होता. या प्रकरणा मुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. या गंभीर समस्येची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी यशश्री शिंदेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडील व नातेवाईकांची भेट घेतली.व त्यांचे सांत्वन केले.यावेळी यशश्रीच्या आई-वडिलांनी यशश्री सोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली व यशश्रीला न्याय देण्याची विनंती केली. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी सदर दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यशश्रीच्या आई वडिलांना दिले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत,उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर,युवा अध्यक्ष
समद बोंबले,अमित साहू,संदेश म्हात्रे,दिनेश पाटील, महिला पदाधिकारी शोभा चौगुले, देवकी शिंदे, साधना वाणी, केदारे मॅडम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी शिंदेच्या कुटुंबीयांची भेट घेउन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रूपालीताई चाकणकर म्हणाल्या की 'आरोपीला जात-पात धर्म पक्ष काहीही नसतो.ती एक विकृती आहे.कोणीही जातीपातीचे राजकारण करू नये.दिवसेंदिवस समाजात अशा विकृती वाढत चालले असून अशा विकृतीचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. समाजात वाईट कृत्य, वाईट गोष्टी घडू नये यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. राज्यात महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस प्रशासन त्याचे काम योग्यरीत्या करीत आहेत.यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल यासाठी मी जातीने लक्ष घालेन' असे रुपालीताई चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.याप्रसंगी उपस्थित उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी सदर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व यशश्री शिंदेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व प्रशासनाकडे केली आहे.
0 Response to "आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार. - रूपालीताई चाकणकर "
टिप्पणी पोस्ट करा