
म्हसल्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणावर हल्ला... हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. तर म्हसळा पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत सराईत गुन्हेगाराला केली अटक...!
विशेष प्रतिनिधी : म्हसळा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत असतानाच दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी एका सराईत गुन्हेगाराने 27 वर्षांच्या तरुणावर जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला केला याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे
म्हसळा शहरातील म्हसळा नवा नगर येथे राहणारा फिर्यादी यांचा पुतण्या महंत चव्हाण हे सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून आपले घरापासून दिघी रोड येथून म्हसळा बाजारपेठेत येत असताना दिघी रोड येथे असणाऱ्या सफिया मंजिल येथे असणाऱ्या केरला बेकरी जवळ आले असता आरोपी अब्दुल करीम अब्दुल हमीद हळडे उर्फ करीम लाला वय 27 वर्षे रा.म्हसळा हा महंत चव्हाण यांच्या समोर दुचाकीवरून येऊन कट मारून गेला असता महंत चव्हाण यांनी कट मारला म्हणून विचारणा केली असता, याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी करीम लाला याने महंत चव्हाण यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपी याने महंत चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मोठ्या लाकडी दांड्याने डोक्यात मारून तसेच पाठीत पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये फिर्यादी यांचा पुतण्या महंत चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरी या प्रकरणी श्री.बाबुराम चव्हाण वय - 51 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं 85/2024 भारतीय न्या.सं कलम 109,352 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून म्हसळा पोलीस ठाण्याचे पो. सहा.निरीक्षक श्री. आवटी यांच्या मार्गदर्शनाने PSI एडवले, पो.हवा 847 चव्हाण,पो.ना 2380 विघे, पोशि 2105 चितारे ,पोशि 2315 कांबळे यांनी सदरील आरोपीस सुरई येथून ताब्यात घेतले आहे. तडीपार कुख्यात गुंड आरोपी करीम उर्फ करीम लाला याने सकलपच्या युवकावर प्राणघातक हल्ला केला. नेमकं म्हसळ्यात चाललंय तरी काय.? ही लोक तडीपार असताना म्हसळ्यात येण्यास बंदी असून सुद्धा बिंदास दहशत मजवतात. याला जबाबदार कोण ? तसेच सदरील आरोपी वर मागील काही वर्षांपासून अनेक गुन्हे नोंद असून आरोपी अब्दुल करीम अब्दुल हमीद हलडे उर्फ करीम लाला यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे.
0 Response to "म्हसल्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणावर हल्ला... हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. तर म्हसळा पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत सराईत गुन्हेगाराला केली अटक...!"
टिप्पणी पोस्ट करा