मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पेट्रोलिंग की मच्छिमार बांधवांसाठी मनस्ताप  ?

पेट्रोलिंग की मच्छिमार बांधवांसाठी मनस्ताप ?


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे ) दिनांक 3  फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ची वेळ सदर मासेमारी नौका मच्छीमारी करून कसारा (भाऊचा धक्का) बंदरात मच्छी उतरविण्यासाठी कसारा बंदराच्या अगदी निकट आलेली, तितक्यात पेट्रोलिंग करत असलेली ही बोट मच्छिमारी बोटीला थांबण्याचा इशारा करुन त्या बोटीला त्यांची बोटं रस्सी बांधून मासेमारी बोट उभी केली जाते.नंतर बोटीची झाडाझडती सुरू होते. बोटींची कागदपत्रे,खलाश्यांची ओळखपत्रे तपासणी होते. नंतर मच्छीने भरलेले खण  (box) तपासणी होते.10 ते 15 दिवस समुद्रात मासेमारी करुन आलेले तांडेल व खळाशी अगोदरच बोट कधी धक्क्यावर लावतो अश्या मानसिकतेत असताना हा प्रकार घडत असतो.जर एखादं - दुसरा खळाशी आजारी पडलेला असल्यास त्याच्या बदली दुसरा खळाशी घेऊन गेलेले असल्यास किंवा फीशिंग परवान्याची मुदत संपलेली असल्यास पेट्रोलिंग  बोटी वरील अधिकाऱ्यांच्या जाचामुळे बोटीवरील खलाशी, तांडेल अगतीक होतात .  काही वेळा तर अधिकारी आर्थिक किंवा क्वालिटी मासळीची मागणी करतात.असे प्रकार रोज काही मासेमारी नौकाच्या बाबतीत घडत असतात.याबाबत मच्छिमार संस्था, सामाजिक कार्यकर्ते हे मासेमारी करणाऱ्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित होणार आहेत.लवकरच या समस्या बाबत मच्छिमार बांधव आवाज उठविणार असल्याचे समजते.पेट्रोलिंग करताना मच्छिमार बांधवाना पोलीस प्रशासन कडुन त्रास देण्यात येत असल्याने याकडे वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांनी या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती स्थानिक मच्छीमारांनी पोलीस बांधवाकडे केली आहे.

0 Response to "पेट्रोलिंग की मच्छिमार बांधवांसाठी मनस्ताप ?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...