मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बशीर भाई हजवाने आमच्यासाठी देव माणूस,, जितेंद्र पवार..

बशीर भाई हजवाने आमच्यासाठी देव माणूस,, जितेंद्र पवार..


दापोली प्रतिनिधी - मुझममिल जैतापकर : - माणुसकीला कोणताच धर्म नसतो,माणुसकी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे याच एकमेव सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बशीर भाई हजवाने खेड तालुक्यातील उधले गावातील प्रसिद्ध उद्योजक आणि कोकण रत्न बशीर भाई हाजवाने हे पुन्हा एकदा गोर गरीब जनतेच्या सेवे साठी धाऊन आले आहेत . उदले गावातील बौद्ध वाडी येथे एका कुटुंबीयांना मोफत संपूर्ण घर बांधून दिले आहे जो काही खर्च झाला आहे तो सर्व खर्च बशीर भाई ह्यांनी करून पुन्हा एकदा माणुसकीचा धर्म मोठा आहे हे सिद्ध केले आहे त्यामुळे बशीर भाई ह्यांचे सर्व ठिकाणी कौतूक केले जाते आहे .जितेंद्र पोवार हे उदले गावातील रहिवाशी आहेत आणि बशीर भाई ने त्यांना मदतीचा हात पुढे केला आणि पवार ह्यांची मदत केली बशीर भाई चे सहकारी खालिद भाई चौगले ह्यांच्या हस्ते ह्या घराचा उद्घाटन करण्यात आला आणि सर्व ठिकाणी ह्याचा आनंद ही साजरा करण्यात आला येत्या काही दिवसात नेक घरे बशीर भाई च्या माध्यमातून बांधण्यात येतील अशी ही चर्चा सध्या उधले गावात सुरू आहे बशीर भाई ची ही कामगिरी पाहून कोंकण २४ न्यूज त्यांच्या ह्या कामाला सलाम करीत आहे. तर बशीर भाईंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजाला नक्कीच नवी दिशा देण्याचे काम होत आहे असे मत ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "बशीर भाई हजवाने आमच्यासाठी देव माणूस,, जितेंद्र पवार.."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...