
साखरोणे धारवली येथे शिवसेनेचा विजयी मेळावा.
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
Comment
प्रतिनिधी/संदीप लाड :- श्रीवर्धन तालुक्यातील साखरोणे धारवली ग्रुप ग्रामपंचायतीवर सलग तीन वेळा भगवा फडकला या निमित्ताने शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे)वतीने साखरोणे येथे रविवार दि.१५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळेस सरपंच रूचीता राजेंद्र विचारे,उपसरपंच मालती पवार व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..
सत्कार समारंभा वेळेस विधानसभा संपर्क प्रमुख सुजीत तांदळेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,"साखरोणे धारवली ग्रुप ग्रामपंचायती वर सलग तिसर्यांदा भगवा फडकतोय.सगळ्यांची मेहनत फळाला आली.सुरूवातीला मनावर थोड दडपण होत मनात थोडी शंका होती पण येथील पदाधिकार्यांना घेऊन मी एकदा शिवसेना भवनात गेलो.तिथे तिसर्या मजल्यावर आई भवानी मातेचे मंदिर आहे.आईचा आशिर्वाद घेतला व भवानी मातेच्या आशिर्वादाने ग्रामपंचायत तिसर्यांदा आमच्या कडे आली.ह्या गावात श्री समर्थ रामदास स्वामींचा भगवा,शिवरायांचा भगवा आणि श्रीराम प्रभुंचा भगवा कधीही खाली उतरून देणार नाही.जिथे विश्वास,निष्ठा असते तिथे काही कमी पडतं नाही."असे तांदळेकर यांनी सांगितले. विजयी मेळाव्यास पंचायत समिती माजी सभापती बाबुराव चोरगे,तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर,उपतालुकाप्रमुख सचीन गुरव,तालुका संघटक दिपक देवकर,जगन्नाथ चाळके,साखरोणे शाखाप्रमुख अशोक घाग,राजेंद्र विचारे, अनील विचारे धारवली शाखाप्रमुख दत्ताराम पवार तसेच श्री साखरोणे ग्रामस्थ,नवतरूण नमन मंडळ.वरची वाडी,श्री जाखमाता महिला मंडळ वरची वाडी,मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.
सत्कार समारंभा वेळेस विधानसभा संपर्क प्रमुख सुजीत तांदळेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,"साखरोणे धारवली ग्रुप ग्रामपंचायती वर सलग तिसर्यांदा भगवा फडकतोय.सगळ्यांची मेहनत फळाला आली.सुरूवातीला मनावर थोड दडपण होत मनात थोडी शंका होती पण येथील पदाधिकार्यांना घेऊन मी एकदा शिवसेना भवनात गेलो.तिथे तिसर्या मजल्यावर आई भवानी मातेचे मंदिर आहे.आईचा आशिर्वाद घेतला व भवानी मातेच्या आशिर्वादाने ग्रामपंचायत तिसर्यांदा आमच्या कडे आली.ह्या गावात श्री समर्थ रामदास स्वामींचा भगवा,शिवरायांचा भगवा आणि श्रीराम प्रभुंचा भगवा कधीही खाली उतरून देणार नाही.जिथे विश्वास,निष्ठा असते तिथे काही कमी पडतं नाही."असे तांदळेकर यांनी सांगितले.
विजयी मेळाव्यास पंचायत समिती माजी सभापती बाबुराव चोरगे,तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर,उपतालुकाप्रमुख सचीन गुरव,तालुका संघटक दिपक देवकर,जगन्नाथ चाळके,साखरोणे शाखाप्रमुख अशोक घाग,राजेंद्र विचारे, अनील विचारे धारवली शाखाप्रमुख दत्ताराम पवार तसेच श्री साखरोणे ग्रामस्थ,नवतरूण नमन मंडळ.वरची वाडी,श्री जाखमाता महिला मंडळ वरची वाडी,मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.
0 Response to "साखरोणे धारवली येथे शिवसेनेचा विजयी मेळावा."
टिप्पणी पोस्ट करा