
ताम्हाणे शिर्के कासारमलई या मार्गावरील झाडी झुडपे देतात अपघाताला आमंत्रण. अरुंद रस्ता ठरतोय धोकादायक ; प्रशासनाचे दुर्लक्ष.
रविवार, ११ डिसेंबर, २०२२
Comment
अबरार अमीनता : म्हाणे शिर्के फाटा ते कासारमलई या मार्गावर मोठ्या प्रमाणात वळणावरती झाडे झुडपे वाढलेले असून समोरून येणारे वाहन दिसत नाही. मोठ्या गाडीला बाजूला घेण्यास खुप अडचण येते तसेच समोरून येणारे वाहन कोणत्या व कशा पद्धतीत असेल याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. हा रस्ता तालुक्यातील प्रमुख ठिकाणांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरत असल्याने अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असून, वळणावळणाचा आहे. त्यातच आता रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हा रस्ता चांगलाच धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. मग आता अपघात झाल्या नंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन जागे होणार का? असा प्रश्न स्थानिक रहिवाशी, प्रवासी व वाहन चालक यांच्याकडून होत आहे.
सदर मार्ग हा डोंगराळ आहे, पावसाळ्या आदी हा रस्ता बनविण्यात आला होता. या रस्त्याचे खडीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली नाही. समोरासमोरून वाहने आल्यास त्यांना मार्ग काढण्यास अडचणी येतात. रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपे असल्यामुळे वाहने फारच काळजीपूर्वक चालवावी लागतात. यासह साईड पट्टी ही मोठ्या प्रमाणात खचली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे त्वरित लक्ष देऊन या मार्गावरील झाडेझुडपे व खड्डे साईड पट्ट्या भराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेली अनेक दिवस वरिष्ठ अधिकारी याबाबत आश्वासन देत आहेत. येत्या चार दिवसात जर काम सुरू नाही झाला तर अधिकाऱ्यांना घेराव घालून आक्रमक भूमिका घेतली जाईल...नंदू शिर्के (मा.तालुका प्रमुख म्हसळा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अबरार अमीनता : म्हाणे शिर्के फाटा ते कासारमलई या मार्गावर मोठ्या प्रमाणात वळणावरती झाडे झुडपे वाढलेले असून समोरून येणारे वाहन दिसत नाही. मोठ्या गाडीला बाजूला घेण्यास खुप अडचण येते तसेच समोरून येणारे वाहन कोणत्या व कशा पद्धतीत असेल याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. हा रस्ता तालुक्यातील प्रमुख ठिकाणांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरत असल्याने अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असून, वळणावळणाचा आहे. त्यातच आता रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हा रस्ता चांगलाच धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. मग आता अपघात झाल्या नंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन जागे होणार का? असा प्रश्न स्थानिक रहिवाशी, प्रवासी व वाहन चालक यांच्याकडून होत आहे.
0 Response to "ताम्हाणे शिर्के कासारमलई या मार्गावरील झाडी झुडपे देतात अपघाताला आमंत्रण. अरुंद रस्ता ठरतोय धोकादायक ; प्रशासनाचे दुर्लक्ष."
टिप्पणी पोस्ट करा